अहमदनगर- नगर महापौर निवडणुकीत वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे शिवसेनेनं छिंदमला चोप दिला आहे तसेच त्याचं मतदान नाकारले आहे.भाजप आणि राष्ट्रवादी यांचीच ही
करणी आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच छिंदमने शिवसेनेला मतदान केलं आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला. त्यामुळे तो कोणाला मतदान करेल याकडे साऱ्यांच लक्ष
लागलं होतं. सेनेचे बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी छिंदमने हात उंचावला होता.दरम्यान, छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी
आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मतदान करायला शिवसेनेनेच सांगितले होते
शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचाच मला मतदानासाठी फोन आला होता, असा दावा श्रीपाद छिंदम यानं केला आहे. त्यानं याबाबत एक ऑडिओ क्लीप सादर केली आहे.श्रीपाद छिंदम
यानं सादर केलेली ऑडिओ क्लीप बनावट आहे, असं म्हणत बाळासाहेब बोराटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी शिवसेनेला बदनाम करण्यासाठीचं छिंदमला
सेनेला मतदान करण्यास सांगितलं, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
दरम्यान, श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं पीठासन अधिकारी राहूल द्विवेदी यांनी सांगितले आहे.